योजना राबविणे मागची उद्दिष्टे
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्याकरिता ही योजना सुरु करण्यात आली आहे.
योजनेचे लाभाचे स्वरूप
बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्याकरिता रु.3.१५ लाखांची आर्थिक मदत.
अटी व शर्ती
• अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे राहवासी असावेत
• स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान ८०% सदस्य हे अनुसूचित जाती वा नवबौद्ध घटकातील असावेत तसेच अध्यक्ष, सचिव, अनुसूचित जाती प्रवर्गातील असावेत
• ट्रॅक्टर व त्याच्या उप्साधानांच्या खरेदीवर रु. 3.१५ लाख शासकीय अनुदान अनुञेय राहील.
• ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा आर्थिक अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येईल.
संपर्क
संबंधित जिल्ह्याचे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण.